हरभरा लागवड तंत्रज्ञान
हरभरा लागवड तंत्रज्ञान रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. या पिकास शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण असे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यातील गेल्या दोन ते अडीच दशकामधील हरभरा लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता याचे अवलोकन केले असता, यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात हरभ-याखाली क्षेत्र वाढत जाऊन सन २०१४-१५ मध्ये १४.२७ लाख हेक्टरपर्यंत पोहचले आणि त्यापासून १o.८८ लाख टन हरभरा उत्पादित झाला. तसेच सरासरी हेक्टरी उत्पादकता ७.६२ क्रेिटल/हेक्टरपर्यंत जाऊन पोहचली. प्रगतिशील शेतक-यांच्या शेतावरील नव्या वाणांचे उत्पादन हेक्टरी ३0 ते ३५ कैि. पर्यंत जाऊ शकते असा अनुभव आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारित वाणांचा वापर केल्यास या विदर्भातील शेतकरी या पिकासाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडून हस्त नक्षत्रावर पडणा-या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन अतिशय मोठमोठ्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करतात आणि समाधानकारक उत्पादन घेतात. सन २०१६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून साजरे होत आह...